आमच्या विषयी...
Images

निसर्गातील विविध चमत्कार, आकाशस्थ ग्रह ताऱ्याबद्दलची उत्सुकता, इतिहासातील प्राचीन वारसा, आपल्या आजुबाजुच्या पृथ्वीतलावरील निसर्गातील विविध घटना, ऍमेझॉनचे खोरे, धु्रव प्रवेश, अंतराळ विश्व हे केवळ पुस्तकात वाचुन किंवा कधी-मधी इंटरनेटच्या माध्यमातुन त्यात डोकावुन त्याची अनुभुति घेता येत नाही. अशा ठिकाणी जाणेही शक्य नसते. मोठमोठया महानगरामध्ये शासनातर्फे केलेली ही सुविधाही प्रचंड महागडी निवास व मेसची व्यवस्था, दळणवळण सुविधा व महानगराबाबतची असुरक्षितता या व इतर कारणांमुळे सहज साध्य नाही.
      अशा स्थितित हे सर्व विश्व आमच्या ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्यापासुन वंचितच राहणार का ? कधी काळी सटी-मासी तेथे जावुन आमची उत्सुकता केवळ ताणलीच जाणार का ? आयुष्यात एखाद्यावेळेस एखाद्ये सहज उपलब्ध असणारे, व सर्व दृष्टीने सोयीस्कर व परवडणारे सेंटर उभेच राहणार नाही का ? अशा अनेक प्रश्नांतुन एफर्टस्‌ने आपल्या स्पर्धापरीक्षा केंद्राबरोबरच हा प्रकल्पही हाथी घेतला. महाराष्ट्रातील सर्वांना सहज साध्य सुरक्षित व निवांत असे पर्यटन स्थळ जे Educational Entertainment Center बनेल असे Science Center उभारण्याचे काम एफर्टस्‌ने हाथी घेतले. त्यातील Educational Entertainment Center मधील "तारांगण" हा एक प्रकल्प.
      या प्रकल्पात वापरली जाणारी डीजीस्टार-4 ही system जगातील अत्यंत अद्यावत व सर्वात आधुनिक अशी Wireless Control System आहे. यात प्रत्येक सेंकदाला 60 चित्रांचा Play Back मिळतो. 8k X 8k डोंबसाठी ही एक आदर्श System मानली जाते. या तारांगणद्वारा जगातील प्रगत देशात विकसित होणाऱ्या व केवळ Dome वरच दाखविता येणाऱ्या विविध विषयांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या film Shows आम्ही दाखविणार आहोत.
      इतरत्र केवळ नियमित film वर आधारित shows दाखवितात व तेही ठराविक वेळी त्यामुळे वेळ व पैसा नाहक खर्च होतो. त्याऐवजी आतापावेतो तयार असलेला कोणताही show व तो कोणत्याही वेळी आम्ही आपणास उपलब्ध करणार एक नवी संकल्पना आपणा सर्वाच्या रोजच्या जीवनात विरगुंळा तर देईलच परंतु आपल्या पाल्यास विविध क्षेत्रातील ज्ञानाची अनुभुति देईल. ज्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रूंदावत जातील. केवळ 10 ते 15 जणांसाठी सुध्दा show दाखविले जातील.