नक्षत्र उद्यान

नक्षत्र उद्यान ही ऋषी मुनींच्या काळापासुन चालत आलेली संकल्पना आहे. यामध्ये 360 अंशाचे संपूर्ण वर्तुळ आहे.
360 ÷ 12 = 30 अंशाचे 12 भाग केलेले आहेत. प्रत्येक भागास राशी म्हणतात. अशा एकुण 12 राशी आहेत.
एका राशीमध्ये 9 चरण असतात म्हणजे 1 चरण = 30 ÷ 9 = 3 अंश 20 मिनीटे अशा चार चरणांचे 1 नक्षत्र होते
म्हणुन 4 × 3 अंश 20 मिनीटे = 13 अंश 20 मिनीटांचे 1 नक्षत्र होते. अशी 27 नक्षत्रे ऋषीमुनीनी सांगितली आहेत.
त्यातील काही नक्षत्रांची माहिती शोच्या पहिल्या भागात आपल्याला पहावयास मिळेल.
या 27 नक्षत्रांसाठी आयुर्वेदाने 27 आराध्य वृक्षे निश्चित केलेली आहेत.
साधारणत: त्या - त्या नक्षत्रात जे-जे वृक्ष त्या-त्या प्रमाणात वाढतात व त्यांचे ऑक्सिजन देण्याचे प्रमाण योग्य असते.
तो वृक्ष त्या-त्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तिंसाठी प्रमाणबध्द श्वासोश्चवासास मदत करत असल्याने त्यास त्या व्यक्तिचा आराध्य वृक्ष मानतात.
ज्योतिष व आयुर्वेदामध्ये असे आराध्यवृक्ष, पर्यायी वृक्ष व धार्यावर्धी वृक्ष (वृक्षाच्या मुळ व खोडाच्या दांड्या हातात किंवा गळ्यात घालतात) दिलेले आहेत.
त्यानुसार आम्हांला उपलब्ध झालेल्या 27 वृक्षांची मांडणी 27 नक्षत्रात केलेली आहे.
(अर्थात जे 1/2 महाराष्ट्रात मिळत नाही ते बाहेरून मागवलेली आहेत)
* भारतात कुठेही नाही अशी, 80 फुट व्यासाच्या वर्तुळामध्ये अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने अंशाची मिनीटांमध्ये विभागणी करून उद्यानाची बांधणी केली आहे.
* प्रत्येक राशीत नक्षत्रांची जशी विभागणी असते ती जशीच्यातशी आपणास येथे पाहावयास मिळते.
* प्रत्येक नक्षत्राच्या आराध्यवृक्षाची खगोलिय, ज्योतिषिय व आयुर्वेदीय मांडणी प्रवेशद्वारावरील चक्रात व आयुर्वेदिय माहिती त्या-त्या राशीसमोर दाखविलेली आहे.
* श्रध्दा-अंधश्रध्दाच्या फंदात न पडता आरोग्यदायी वृक्षांच्या सानिध्यात कांही क्षण व्यतित करणे शास्त्रीय दृष्टयाही नक्कीच फायदेशीर राहील.
प्रवेशद्वारावरील चक्रातील मधल्या पांढऱ्या चक्रात ऊर्जेचा मुलाधार सूर्य दर्शविलेला असुन त्यासमोर लोलक (प्रिझम) ठेवुन त्या पांढऱ्या सूर्य प्रकाश शलाकेचे तरंगलांबी नुसार (़ुर्रींशश्रशपसींह)
सप्तरंगात विभाजन दाखविले आहे. ते सप्त रंग म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा (ठशव, जीरपसश, धशश्रश्रेु, ॠीशशप, इर्श्रीश, खपवळसे,
तळेश्रशीं = तखइॠधजठ)
या रंगांपैकी तांबडा : ऋतु नारंगी : मराठी महिने
पिवळा : राशी व ज्योतिषिय वर्णन
हिरवा : नक्षत्र आकृती व ज्योतिषिय वर्णन
निळा : खगोलिय माहिती
पारवा : आराध्यवृक्षाचे नाव व चित्र
जांभळा : आयुर्वेदीय माहिती सांगतो.
असे ज्योतिषिय, खगोलिय व आयुर्वेदिय संरचनात्मक चक्र तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालेल.
तसेच डाव्या बाजुस क्रांतीवृत्ताच्या दोन्ही बाजुस 27 नक्षत्रांची स्थाने (ठिकाणे) कोठे व कसे आहेत हे दाखविले आहे.
हिवाळा व उन्हाळ्यात रात्री 9 ते 12 च्या दरम्यान स्कायऑबझरवेशन कोणत्या व कशा पध्दतीने करावयाचे,
अभ्यासायचे हे येणाऱ्या सहलींना दाखविले जाणार आहे. त्यासाठी तीन वेगवेगळ्या लेन्सच्या आरशांच्या परावर्ती व भिगांच्या दूरदर्शी दुर्बिणी येथे बसविण्यात येत आहेत.


ऑडिटोरिअम

ऑडिटोरिअम मध्ये सध्या आपण रेडिओ टेलिस्कोपचे पोस्टर प्रदर्शन पाहणार आहोत.
अनेक देशांनी अशा दूर्बिणी उभ्या केल्या आहेत.
त्यास अब्जावधि रूपये खर्च येतो.
त्यापैकी कांही सर्वात मोठ्या दुर्बिणीची व भविष्यातील कांही दूर्बिणीची येथे पोस्टर द्वारा माहिती देणारे प्रदर्शन आम्ही ऑडिटोरिअममध्ये भरवलेले आहे.
विश्वातील प्रगत अशा आठ आणि भविष्यातील 3 अशा 11 दुर्मिळ दुर्बिणीचे प्रदर्शन आम्ही पोस्टर द्वारा येथे आमच्या विस्तीर्ण,
विलोभनिय व आर्किटेक्चरच्या उत्कृष्ष्ठ नमुना असलेल्या सभागृहामध्ये भरवलेले आहे.
या दुर्बिणींद्वारा पाठविलेल्या फोटोंचा प्लॅनेटोरिअम शो बनविण्यासाठी खुप उपयोग होतो.
अशा दुर्बिणींची ऑडिटोरिअम मध्ये जाऊन आपण माहिती घेवुया.


ओ-इन पार्क

सुट्टीच घालवायची म्हणजे जीभेचे चोचले व पोटोबाचा विचार क्रमप्राप्त आहे.
तोही विचार करून आम्ही या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
10,000 चौ. फुटाचे कॅन्टीन व मेस ओ-इन पार्कच्या रूपात उभे केले आहे. ते जास्तीत जास्त प्रगत व विकसित करण्यास सुरूवातही केली आहे.
लवकरच ते अद्यावत करून त्याचेही शानदार उद्‌घाटन करणार आहोत.
शाळा, कॉलेजच्या ट्रीप व त्यांच्या जेवण व राहण्यासाठीच्या सर्व समस्यांचा खिशाला परवडेल असा विचार करून तसे प्रोजेक्टसही रसिक प्रेक्षकांसाठी तयार केले आहेत.
त्याद्वारा एक - दोन दिवसाचे र्ींेीी िीेसीरााश ही दिले आहेत.
आमच्या ब्राऊचर्स्‌ द्वारा, नक्षत्र मार्गदर्शन पुस्तिकेद्वारा अथवा आमच्या वेबसाईला भेट देऊन किंवा प्रत्यक्ष समक्ष भेट देऊन ही सर्व माहिती आपण घेऊ शकता.
अशा या नयनरम्य व मुलाबाळांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या व त्याच बरोबर स्वत:चे मनोरंजन करणाऱ्या परिसरास भेट देऊन,
रोजच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा एका आगळ्यावेगळ्या विश्वात जाऊन आंनदोत्सव साजरा केला असता आपल्या आयुषष्याची दोरी वाढविण्यास मदत होईल.


विज्ञान उद्यान

मोबियस पट्‌टी
गतिवर आधारित लहान मुलांच्या स्नायुंच्या सर्व हालचारी घडवुन आणणारे हे एक व्यायामासाठी सुदंर असे खेळणे आहे.
पट्‌टीच्या कडांना धरून पट्‌टीवरून चालत रहा.
पट्‌टीच्या दोन्ही बाजूनी चालत गेले असतांना देखील तुम्ही त्याच स्थानावर पुन्हा परत येत असल्याचे निरिक्षण करा.
सामान्य पट्‌टीच्या बाबतीत तुम्ही एक तर आतील बाजूने किंवा बाहेरील बाजूने चालू शकता.
मोबियस पट्‌टी ही एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ज्यामध्ये तुम्ही एकाचवेळेस दोन्ही बाजूने चालू शकता.
तरफेचा उपयोग केला असता वजन वाहुन नेण्याची क्षमता वाढते.
हातगाडी हे याचे उत्तम उदाहरण आहे. हातगाडी मध्ये टेकु हा मध्यभागी असतो.
टेकु डाव्या बाजुस, मध्यभागी, उजव्याबाजुस ठेवला असता तरफ क्रं.1, तरफ क्रं.2, तरफ क्रं.3 चे तत्व लक्षात येते.
या उपकरणात स्प्रिंग वजनाचे काम करतो, जर स्प्रिंग व वजन उचलणारा यांच्यातील अंतर कमी असेल तर जास्त बल प्रयुक्त करावे लागते.
संगीतमय नलिका
नलिकेची लांबी व ध्वनी तरंगाची स्वरपट्टी व्यस्त प्रमाणात असतात.
भिन्न लांबी असलेल्या नलिकांवर छोट्या हातोडीने हळूच आघात करून पहा.
भिन्न नलिकांमधून भिन्न भिन्न स्वरपट्टीचा ध्वनी उदगमीत होताना दिसतो.
स्वतंत्र रूपांमधे लटकवलेल्या नलिकांमधून निर्माण होणारी स्वरपट्टी त्यांच्या लांबीवर अवलंबून असते.
नलिका जेवढी छोटी, तेवढी तिची स्वरपट्टी मोठी असते.
वेगाने फिरा
खुर्चीवर बसा. दोन्ही वजनांना हातभर लांब अंतरावर ठेवून पकडा.
तुमच्या मित्रास तुम्हास हळूच फिरवण्यास सांगा.
फिरत असतांनाच दोन्ही हाताने वजनास आपल्याकडे ओढल्यास तुम्ही वेगाने फिराल.
दोन्ही वजनांना पुन्हा दूर केल्यास तुमचा वेग कमी होईल हीच प्रक्रिया अनेकदा करा.
कोनीय संवेग हा वस्तूमान, वेग आणि त्रिज्येवर अवलंबुन असतो.
वजनांना केंद्राजवळ ओढून जर त्रिज्या कमी केली तर कोनीस संवेग वाढतो.
समतोल तत्वावर आधारित झोका
न्युटनचा जडत्वाचा नियम व समभुजा तराजुचे तत्व.
तुम्ही एकाच बाजुने झोका खेळण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हास खेळता येणार नाही.
दोन्ही बाजुस समान वजन असेल तरच झोका खेळता येतो.
सर्वात कमी वेळ घेणारी मार्गिका
येथील तीन मार्गिकाच्या अगदी वरच्या टोकाला तीनही चेंडू घेवून जा.
तीनही चेंडू एकाचवेळी सोडून देवून निरिक्षण करा.
एक चेंडू दुसऱ्या चेंडू पेक्षा अधिक वेगाने खाली येतो.
आपल्या लक्षात येईल की एका विशिष्ट मार्गिकेतूनच चेंडू अधिक वेगाने खाली घरंगळतो. या विशिष्ट मार्गिकेला वक्रज (सायक्लॉइड) म्हणतात.
लांबीने सरळरेषीय मार्ग हा जरी सर्वात लहान असला तरी गुरूत्वीय खेचामुळे सर्व वस्तु वक्रज मार्गिकेतून अधिक वेगाने खाली येतात.
उतरण
पहा, वेगवेगळ्या दोरीने सारखे वजन लटकवलेले आहेत.
उजव्या कडील दोरीने वजन हळूच सरळ वरती उचला.
आता दुसरे दोन्ही एक एक करून उतरणाच्या साह्याने हळूच उचला.
सरळ उभ्या चढणीत ठराविक वजन उचलण्यासाठी जास्तीत जास्त बलाची गरज असते आणि जसजसा चढ कमी कमी होत जाईल तसतसे तेवढेच वजन उचलण्यासाठी लागणारी बल कमीकमी होत जाते.
थोडक्यात जड वजन उचलण्यासाठी हे सर्वात साधे यंत्र उतरण हे उपयोगात आणले जाते.


सावलीचे घड्याळ

* विश्वातील सर्व सनडायल स्थिर आहेत, परंतु इथे चेींळेप असलेले सनडायल आहे.
* या सनडायल ला केीळूेपींरश्र व तशीींळलरश्र अशा दोन्ही प्रकारच्या ग़ती आहेत.
* अशा प्रकारच्या दोन्ही गती असलेल्या यंत्राचे पार्ट सुध्दा दुर्मिळ आहेत.
* हे पृथ्वीचे दोन्ही गती असलेले मॉडेल असुन याद्वारा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाचा संपूर्ण अभ्यास करता येतो.
* यातील एक वर्तुळपाकळीत पृथ्वीचे अंतरंग, घटक व कलता परीणाम (ढळश्रींू शषषशलीं) चाही अभ्यास करता येईल अशाप्रकारची मांडणी केलेली आहे.
* याद्वारा पृथ्वीचुंबकाचे दक्षिण व उत्तर धु्रव, चुंबकीय अक्ष व चुंबकीय प्रतलचाही अभ्यास करता येतो.
* तसेच खरा दक्षिण धु्रव, खरा उत्तरधु्रव, खरा भौगोलिक अक्ष, खरे प्रतल निश्चित करता येते.
* या खऱ्या भौगोलिक अक्षावर प्रयोगाद्वारा अभ्यास करून त्याठिकाणचे अक्षांश व रेखांश निश्चित करता येतात.
* गाईडच्या मदतीने याचा अभ्यास केल्यास प्राकृतिक भूगोलातील 50 ते 60 पाने एका तासात शिकता येतात.
* शिवाय सनडायलची तबकडी कशी बनवितात व वेळ कशी निश्चित करता येते हे ही समजुन घेता येते.
* आपल्या पुर्वजांचे सनडायल हे दिवसाचे घड्याळ होते तर तारांगण हे रात्रीचे घड्याळ होते. दर्यावर्दी लोक त्याचा अचुक उपयोग करीत.