एफर्टस् डिजीटल तारामंडल
Images

आतापावेतो उच्च प्रतिची गुणवत्ता, उत्कृष्ठ कार्यक्रमाचे दिमाखदार दर्शन व आंतरिक समाधान ही फक्त मोठमोठ्या तारांगणाचीच मक्तेदारी होती. परंतु यु.एस.ए. (अमेरिका) च्या Evan & Sutherland कंपनीने संशोधित केलेल्या डीजीस्टार प्रणालीमुळे (Digistar System) ही अशक्य साध्य:प्राय गोष्ट आता छोट्या तांरागंणाना सुध्दा शक्य झाली आहे. डीजीस्टार - 1, 2, 3, 4 या विविध प्रणांलीमुळे 8 मीटर डोंबवर सुध्दा तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त उच्च प्रतीच्या गुणवतेचे दिमाखदार दर्शन होत आहे.
      एफर्टस् ऍकॅडमीने, या क्षेत्रात घडलेल्या तारांगण-जगतातील बदलाचा सर्वांगिन अभ्यास करून महाराष्ट्रातील तमाम विज्ञानप्रेमी व विद्येची भोक्ती असलेली महाराष्ट्रातील जनता व विद्यार्थ्यांसाठी हे दालन खुले करण्याचे ठरविले. त्यानुसार एफर्टस् ऍकॅडमीने धनगरवाडी येथील एफर्टस् शैक्षणिक संकुलात Edu - Entertainment center उभे करून त्यात तांरागणरूपी कोंदण उभे करण्याचे ठरविले. व नुसते ठरविले नाही तर दोन वर्षात हे स्वप्न साकारलेही.
      आज झश्ररपशींरीर्ळीा तारांगण पहाण्यासाठी नेहरू सायन्स सेंटर, बॉम्बे अथवा हैद्राबाद सायन्स सेंटर अथवा सुरत सायन्स सिटी किंवा कलकत्ता सायन्स मुझियम मध्ये जाण्याची गरज नाही.
      सर्व विद्यार्थी, पालक यांच्या आर्शीवादाने अंत्यत प्रगत अशी Digistar - 4 या आधुनिक प्रणालीसह एका माध्यमिक शिक्षकाने उभारलेले खाजगी तत्वावरील, अत्याधुनिक सोयींनी युक्त असे हे पहीलेच तारांगण महाराष्ट्राच्या सेंटर प्लेस मध्ये अहमदनगर येथे साकारले आहे.
      हे नुसतेच तांरागण नाही, तर ते One Man Show असे पहिले तारांगण आहे. कोणाचीही मदत न घेता, कर्ज काढुन एका शिक्षकाने उभारलेले, समाजासाठी घेतलेल्या ध्यासाची स्वप्नपुर्ति आहे. एका शिक्षकाने आयुष्यभर पाहिलेले आणि प्रत्यक्षात साकारलेले एक स्वप्न आहे.
      या प्लॅनेटोरिअमची रचना करताना विविध संकल्पना वापरून ते बांधले आहे. वैशिष्टयपूर्ण डोंगर रस्ता, स्वागतासाठी तयार केलेल्या Show - Wall सहीत पादपथ, शुध्द, स्वच्छ थंड पाण्याची सोय, लहान मुलांसाठी खेळण्या तर प्रौढांसाठी नक्षत्र-गार्डनची सफर, ज्यात राशी व नक्षत्रानुसार झाडांचे दर्शन व त्यांची आरोग्यपुर्ण माहिती, प्रशस्त Lawn, सुंदर व नेत्रसुखद अशी Water - body ज्यात विविध रंगाची कमळे मासे, कासव आपणास नेत्र-सुख देतील या Water - body तील छोट्या परंतु मनमोहक अशा पुलावरून आपण प्रवेश करणार आहात मुख्य इमारतीमध्ये. ऑडीटोरिअम मधील सायन्य म्युझियम मध्ये आपण पाहणार आहात वेगवेगळळ्या Science Exibits.
     येथेच डोंब वर आपण कोणता डहेु पहाणार आहात त्याचा कोणत्या प्रकारे आस्वाद आपण घ्यावयाचा त्याचे निवेदना द्वारे आपणास मार्गदर्शनही केले जाणार आहे. त्यानंतर डोंबवर नेत्रसुखद असा मुख्य Show.
      त्या दृष्टिने या Shows ची मोठी लायब्ररी उभी करणे व दरवर्षी वेगवेगळ्या Shows ची त्यात भर घालणे हे ओघाने आलेच.

महत्वाचे
  • Day Workshop : A planetarium show, science museum, children's Science park, Astral Garden, a Practical workshop with breakfast and tea.
  • Regular Annual tour Programme With Different Projects & Practicals
  • We arrange Group Shows On Demand Basic For more details Call us Or Fill Enquiry Form
  • First 100 Students Get Special Discount in Course Fee For more Details contact us
प्रेक्षकांची मते
  • Very Great Experience to see Planetarium Live Show. Thanks Efforts
  • Last Sunday my all family saw Planetarium Live Show. Great Really Amazing.
  • We dont need to go anywhere for Planetarium Show It Available In Ahmednagar at affordable cost. Thanks Jogade Sir.
  • Every one visit Efforts At once it Great Experience