डिजीटल तारामंडल Show

    काही महत्वाचे शो पुढीलप्रमाणे :-
एफर्टस् e-planetarium आजपावेतो संकलीत खगोलीय वस्तु व त्यांची योग्य ती निवड पालक व विद्यार्थ्यांना आवश्यक असे Shows संग्रहीत करत आहे. ज्याद्वारा आपल्या खगोल-भौतिक जिज्ञासा पुर्णत्वास जातील. हे Shows आपणास English,Marathi,Hindi,Kannada,Gujrathi यासारख्या विविध भांषामध्ये पहावयास मिळतील Efforts आपली ही Library दरवर्षी Infovision, India च्या मदतीने Upgrade करीत राहणार आहे. व त्याद्वारा आपल्या पसंतीस उतरतील व मनोरंजाना बरोबरच आपल्या ज्ञानातही भर टाकतील असे Show दाखविणार आहे. पुढील कांही Show आपण डोंब वरील पडद्यावर पहाणार आहात.


Ice Worlds बर्फाचे जग :

    बर्फ, पाणी व जीवसृष्टीचे आस्तित्व व त्यातील नाजुक समतोल हा यापुढील पिढ्यासाठीचा शास्त्रीय चौकस ज्ञानाचा एक महत्वाचा विषय आहे. आपल्यापृथ्वी ग्रहाच्या आर्किटिक व ऍन्ट्राक्टिक मोहिमेतुन, आपणास या ठिकाणच्या पर्यावरणा व्यवस्थेतील सजीवांचे अस्तित्व व त्यांचे योग्य पोषण दर्शविणारी सजीव सृष्टी आढळते व त्याचे जगणे आपल्या जगण्याशी कसे जोडले गेले आहे हे सुध्दा लक्षात येते. पृथ्वी पासुन आपल्या सौर मालिकेतील इतर ग्रह व चद्रांवर सुध्दा बर्फाचे अस्तित्व व बर्फ भुमिचे अस्तीत्व लक्षात येते.मंगळावरील शोध मोहिम

   डॉन डेव्हीस या अवकाश कलेतील एमी परितोषिक विजेत्या कलाकाराच्या मार्ग दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या show मध्ये आतापर्यंत मंगळावर झालेल्या सर्व शोध मोहिमेतील Highlight (महत्वाच्या बाबी) समाविष्ट केल्या आहेत. अवकाशयात्रीनी त्यांच्या शोध मोहीमेत संकलित केलेली नाविण्यपूर्ण माहिती आणि या तांबड्या ग्रहाविषयी आधिक माहिती या show मधे प्रक्षेपित करण्यात येते.


सात आश्चर्ये

    (कालाची प्रांत पालट आणि साक्षदार बना हजारो वर्षापूर्वीच्या आश्चर्यांचे पिरॅमिडसचा शोध घ्या) भव्य मनोऱ्यांच्या सावलीत उभे रहा आणि अनूभव घ्या उरलेल्या सात आश्चर्याचा आपण शोध घेऊया या आश्चर्यांच्या निर्माण प्रक्रियेचा आणि त्याच बरोबरच झलक बघुया जगातील काही अदभूत आश्चर्यांची.


सुर्याची गुपिते

    आपल्या सौरमालिकेतील सूर्याची आपल्या जीवनातील वैशिष्टपूर्ण भूमिका आपण पहात आहोतच. चला सुर्याच्या जीवनचक्रात डोकावुन त्याच्या जन्मापासुन पुढे पुढे जात अंतिम म्हणजेच मृत्युपयर्र्ंतच्या अंतरंगात पोहचुयात या तारांगणरूपी छताखाली.


मोठ्या योजनेचे लघु रूप (वैद्यकीय क्रांती)

    2053 च्या मध्यापयर्र्ंत वैद्यकीय क्षेत्रात निदान पध्दतीत होणाऱ्या क्रांतीद्वारा, तुम्ही एखाद्या जीवाणु इतके सुक्ष्म होवु शकाल व एखाद्या तिव्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रोग्याच्या शरीरात जावुन करू शकाल हवे ते संशोधन ! ही तर असेल आधुनिक धमाल मेडीकल-सायन्सची


अवकाशातील आश्चर्ये

   निरखुन पहा खोल अवकाशात टेलिस्कोपच्या सहाय्याने आणि कोट्यावधी वर्षा मागे प्रवास करून साक्षीदार बना अवकाशगंगेच्या जन्माचे जसा तूमचा प्रवास पुढे जात राहील तसे तुम्ही सखोल दर्शन करू शकाल आपल्या स्वत:च्या अवकाशगंगेचे आणि एका रोमांचक सफरीवरून परत पोचा आपल्या घरी अर्थात पृथ्वीवर.


नवी क्षितिजे

    खास चालत चालत जातानाच शनिच्या बर्फाळ श्वास रोखून धरणाऱ्या ज्वालीमुखीच्या उद्रेकातून निर्मित कड्यातुन करा जादूमय सफर आपल्या सभोवतीच्या शेजारी ग्रह व त्यांच्या चंद्रांची. एका आंतराळा वाहिनीतुन एका धुमकेतुचा पाठलाग करत करत करा मस्त सफर अवकाशाची.


अंतरिक्षातील प्रवास (वैश्विक यात्रा)

    अंतरिक्षातील जीवनाच्या शोधाची सुरवात होते, ती आजपर्यंत शोध न लागलेल्या दूरवर कुठेतरी असलेल्या ग्रहांचे. वेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीत तुम्ही शोधु शकाल एक जग, ज्यातील जैविक प्राणिमात्र आपल्यापेक्षा अगदी वेगळीच दिसू शकतील.